कौटुंबिक शेअरिंग सदस्यांचे प्रकार
कौटुंबिक शेअरिंग गटाचे सदस्य त्यांच्या वयानुसार वेगवेगळी कामे करू शकतात.
नोट : ज्या वयात एखाद्या व्यक्तीला प्रौढ किंवा लहान मूल मानले जाते ते देश किंवा प्रदेशानुसार बदलते.
आयोजक : कौटुंबिक शेअरिंग गट सेट अप करणारी प्रौढ व्यक्ती. आयोजक कुटुंबातील सदस्यांना आमंत्रित करू शकतो, काढून टाकू शकतो आणि गट बंद करू शकतो.
प्रौढ : कौटुंबिक शेअरिंग गटाचा 18 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा सदस्य.
आईवडील/पालक : कौटुंबिक शेअरिंग गटाचा एक प्रौढ सदस्य जो गटातील लहान मुलांसाठी ‘आईवडिलांचे नियंत्रण’ मॅनेज करण्यात मदत करू शकतो. जेव्हा आयोजक एखाद्या प्रौढ व्यक्तीला कौटुंबिक शेअरिंग गटात समाविष्ट करतो, तेव्हा त्या गटात मुले किंवा किशोरवयीन सदस्य असल्यास ते त्यांना आईवडील किंवा पालक म्हणून नियुक्त करू शकतात.
मूल किंवा किशोरवयीन : कौटुंबिक शेअरिंग गटाचा 18 वर्षांखालील सदस्य. स्वतःचे Apple अकाउंट तयार करू शकत नाही अशा लहान मूलाचे अकाउंट आयोजक, आईवडील किंवा पालक तयार करू शकतात. तुमच्या मूलासाठी Apple अकाउंट तयार करा Apple सपोर्ट लेख पहा.