तुमच्या iPhone वर Wi-Fi चालू करणे

सेटिंग  > ‘Wi-Fi’ वर जा, नंतर Wi-Fi सुरू करा.

नेटवर्क जॉइन करण्यासाठी, पुढीलपैकी एकावर टॅप करा :

  • नेटवर्क : आवश्यक असल्यास पासवर्ड प्रविष्ट करा.

  • इतर : लपवलेले नेटवर्क जॉइन करा. लपवलेल्या नेटवर्कचे नाव, सुरक्षा प्रकार आणि पासवर्ड प्रविष्ट करा.

स्क्रीनच्या शीर्षस्थानी Wi-Fi आयकॉन दिसत असल्यास, Wi-Fi नेटवर्कला iPhone कनेक्ट केलेला असतो. (हे पडताळण्यासाठी, ‘वेबपृष्ठ बघा’ वर Safari उघडा.) तुम्ही त्याच स्थानावर परतल्यावर iPhone पुन्हा कनेक्ट होतो.